News

पश्चिम महाराष्ट्र | महाराष्ट्र | देश | क्रीडा

 • RSS पश्चिम महाराष्ट्र

  • मार्केट यार्ड परिसरातून बॅग लंपास January 22, 2018
   छत्रपती शाहू मार्केट यार्ड परिसरात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर अज्ञात चोरट्याने वृद्धाची बॅग लंबवली. बॅगेत सोन्याच्या बांगड्या आणि लक्ष्मीहार होता. ६ नोव्हेंबरला हा प्रकार घडला असून, याबाबत रविवारी (ता. २२) रात्री नऊच्या सुमारास शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.
  • एफडीआय विरोधात आंदोलनाचा इशारा January 22, 2018
   कॅमिट, कैट व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स या तीनही संघटनांनी एफडीआयलाविरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयावर अभ्यास समिती नेमावी. सरकारला प्रस्ताव द्यावा. सरकारने मान्य केले नाही तर सर्व संघटनांनी मिळून आंदोलन करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
  • तवंदी घाटात तवेरा उलटली, ९ जखमी January 22, 2018
   भरधाव तवेरावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने तवेरा उलटून नऊजण जखमी झाले. सर्व जखमी सोलापूर व मुंबईचे आहेत. जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. कर्नाटकातील देवदर्शन आटोपून परत येताना सोमवारी (ता. २२) संध्याकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला.
  • प्राचार्यांसह प्राध्यापकांच्या वेतनाचे ४५ कोटी लटकले January 22, 2018
   ​कोल्हापूर सांगली सातारा या तीन जिल्ह्यातील वरिष्ठ अनुदानित महाविद्यालयांमधील प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी नवे वर्ष पगाराच्या दीर्घ प्रतीक्षेने सुरू झाले आहे. अनुदान जमा न झाल्याने डिसेंबर २०१७ या महिन्याचा पगार अद्याप खात्यावर जमा झालेला नाही.
  • किरणोत्सवातील अडथळे दूर करावेत January 22, 2018
   अंबाबाई मंदिरात ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या उत्तरायण किरणोत्सव सोहळ्यातील मार्गात येणारे अडथळे दूर करण्यासाठी देवस्थान समितीने महापालिकेला विनंती अर्ज दिला आहे. नोव्हेंबरमधील किरणोत्सव सोहळा पूर्ण क्षमतेने झाला.
  • अंबाबाईप्रश्नी पालकमंत्र्यांकडून आश्वासनच January 22, 2018
   अंबाबाई मंदिरातील पुजारी हटवण्यासंबंधीचा कायदा करण्याचे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीरपणे दिले होते. कायदा करणे सहज शक्य आहे. मात्र ते ज्या पक्षाचे आहेत, त्या भाजप पक्षाचे मूळ आरएसएस आहे.
  • बिलाच्या भीतीने आई बाळाला ठेऊन पळाली January 22, 2018
   दहा हजार रुपये बिल कसे भरायचे, या भीतीने सीपीआर रुग्णालयातून सोनाबाई रोहिदास राठोड (२५, रा. राजापूर, जि. रत्नागिरी) यांनी आपल्या नवजात मुलाला ठेऊन पलायन केले. दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. सीपीआर पोलिस चौकीत याप्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.
  • पंतप्रधान मोदी हुकूमशहा : अण्णा हजारे January 22, 2018
   ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. ‘मन की बात करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांचे मन अस्वच्छ आहे. मोदी सरकार इंग्रजांप्रमाणे हुकूमशाही आहे.
  • 'तावडेच पानसरे हत्येचा मास्टरमाइंड' January 20, 2018
   सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हाच कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमागील मास्टरमाइंड आहे. कोल्हापुरात तो सनातन संस्थेचा संघटक म्हणून कार्यरत होता. फरार आरोपी विनय पवार आणि सारंग आकोलकर या दोघांशी तावडेचा संबंध होता...
  • महानगरपालिकेच्या सभेत गदारोळ January 19, 2018
   सांगली-मिरज रस्त्यावरील विजयनगर येथे नव्याने बांधून सज्ज असलेल्या न्यायालयाच्या इमारतीचे रस्त्यावर अतिक्रमण झाल्याचे समोर आल्याने शुक्रवारी सांगली महापालिकेच्या महासभेत गदारोळ झाला. बांधकाम परवाना देताना चुका झाल्याची कबुली देत, तब्बल साडेसहा मीटर बांधकाम रस्त्यावर झाल्याचे अधिकाऱ्यांनी सभागृहाला सांगितले. पाप प्रशासनाने करायचे आणि प्रायश्चित नगरसेवकांनी का भोगायचे?, प्रशासनाने केलेली गंभीर चुक दुरुस्त करण्यासाठी गोर-गरीबांच्या घरावर बुलडोझर फिरविला […]

Source: Maharashtra Times